नंदुरबार - जिल्ह्यातील विसरवाडी पुलावरुन मालवाहूट्रक कोसळुन चालक जबर जखमी झाल्याची घटना धुळे-सुरत महामार्गावरील पानबारा गाव शिवारात घडली. हा मालवाहू ट्रक (टी.एन. 52 एफ.1465) तामिळनाडूहुन सुरत येथे केबल वायर घेवून जाणारा होता.
विसरवाडी पुलावरुन ट्रक कोसळला; चालक गंभीर जखमी - VISARWADI
जिल्ह्यातील विसरवाडी पुलावरुन मालवाहूट्रक कोसळुन चालक जबर जखमी झाल्याची घटना धुळे-सुरत महामार्गावरील पानबारा गाव शिवारात घडली. हा मालवाहू ट्रक तामिळनाडूहुन सुरत येथे केबल वायर घेवून जाणारा होता.
भरधाव वेगात येत असताना पानबारा गावाच्या नदीवर बांधकाम सुरु असलेल्या पुलावरुन खाली कोसळल्याने हा अपघात झाला. 20 फुटावरुन मालट्रक खाली कोसळल्याने मालट्रकचा चक्काचुर झाला. या अपघातात चालक बाळकृष्ण अण्णा दबला गेला. त्यानंतर गावातील नागरिकांनी व पोलिसांनी बाहेर काढुन त्यास विसरवाडी ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शिंदे, अतुल पानपाटील, प्रदीप वाघ करित आहेत.