नंदुरबार - कोरोना संक्रमण वाढू नये यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील बस सेवा बंद करण्यात आली आहे. चार महिन्यांपासून बंद आसलेल्या बस सेवेमुळे नंदुरबार आगाराचे 16 कोटींचे नुकसान झाले आहे. नंदुरबार आगारातून दररोज 675 बस फेऱ्या होत होत्या. त्यातून 14 लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र, चार महिन्यात एकही फेरी न झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्याच्या पगार अद्याप झाला नसल्याचे समोर आले आहे.
लॉकडाऊनमुळे नंदुरबार आगाराचे १६ कोटींचे नुकसान
'मिशन बिगीन अगेन'अंतर्गत अवघ्या 18 बस फेऱ्या सुरू झाल्या, मात्र त्यांनाही प्रतिसाद नसल्याने त्याही तोट्यात असल्याने नुकसान होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कपात व गेल्या जुलै महिन्यापासून पगार न झाल्याने महामंडळातील ड्रायव्हर, कंडक्टर व हेल्पर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
नंदुरबार बस आगारातून राज्याने आंतरराज्य बस सेवा देण्यात येत असेल त्यासाठी 120 गाड्या असलेल्या नंदुरबार आगारातून दररोज 675 बस फेऱ्या होत होत्या. त्यातून सरासरी 14 लाखांचे उत्पन्न मिळत होते. मात्र, चार महिन्यांत एक ही फेरी न झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिशन बिगिन आगेन अंतर्गत आवघा 18 बस फेऱ्या सुरू झाल्या, मात्र त्यांनाही प्रतिसाद नसल्याने त्याही तोट्यात असल्याने नुकसान होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कपात व गेल्या जुलै महिन्यापासून पगार न झाल्याने महामंडळातील ड्रायव्हर, कंडक्टर व हेल्पर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. नंदुरबार आगारा प्रमाणे जिल्ह्यातील इतर चार आगरांची आवस्था आहे.