नंदुरबार - शहराप्रमाणेच गावखेड्यातही मोबाईल वापरण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने समाज माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याने ऑनलाइन फसवणूक करून लूट होणाऱ्या गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होत आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी दिली. ते सायबर सुरक्षा कार्यशाळेत बोलत होते.
नंदुरबारमध्ये सायबर साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याने ऑनलाइन फसवणूक प्रकरणात वाढ - पोलीस अधीक्षक - पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत नंदुरबार
सायबर गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली असून नंदुरबार जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याने ऑनलाइन फसवणूक करून लूट होणाऱ्या गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होत आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी दिली.

पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत
नंदुरबारमध्ये सायबर साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याने ऑनलाइन फसवणूक प्रकरणात वाढ
समाज माध्यमावर वायरल होत असलेल्या मेसेजेसद्वारे सायबर गुन्हे घडत असल्याने नागरिकांनी इंटरनेटचा वापर करताना कशी काळजी घेतली पाहिजे. तसेच कुठलीही गोष्ट दुसऱ्याला पाठवण्याआगोदर त्या बाबीची सत्यता पडताळने गरजेचे असल्याचे पंडीत म्हणाले. पोलीस विभागाच्या सायबर सेल कार्यालयातर्फे प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठी कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. नागरिकांपर्यंत ही माहिती पोहचावी यासाठी हा कार्यक्रम आयोजीत केला होता.