महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाचे पथसंचलन

एकूणच पोलिसांनी जनतेला संचारबंदी काळात बाहेर न पडण्याचे आवाहन केले, त्याचसोबत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलीस दल सज्ज असल्याचा इशारा पोलीस दलाच्या वतीने देण्यात आला आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाचे पथसंचलन
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाचे पथसंचलन

By

Published : Apr 5, 2020, 9:20 PM IST

नंदुरबार- संचारबंदी आणि लॉकडाऊन त्यातच येत्या काळात विविध सण आणि उत्सव असल्यामुळे कायदा आणि सुव्यस्थेच्या दुष्टीने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नंदुरबार शहरातून पथसंचलन करण्यात आले. या पथसंचलनामध्ये राज्य राखीव पोलीस दल आणि जिल्हा पोलीस दलाचे जवान सहभागी झाले होते.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाचे पथसंचलन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवत या पथसंचलनामध्ये जवान सहभागी झाले होते. या पथसंचलनाचे नेतृत्व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी केले. एकूणच पोलिसांनी जनतेला संचारबंदी काळात बाहेर न पडण्याचे आवाहन केले, त्याचसोबत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलीस दल सज्ज असल्याचा इशारा पोलीस दलाच्या वतीने देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details