नंदुरबार- गुजरात आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांच्या सीमा नंदुरबार जिल्हाला भिडल्या आहेत. या जिल्ह्याला लागून दोन्ही राज्यातील सहा जिल्ह्यांच्या सीमा आहेत. त्यामुळे पोलीस दलाच्या वतीने एकूण १४ आंतरराज्यीय सीमा तपासणी नाक्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांना पीपीई (PPE) कीट देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांना संरक्षण देण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
आंतरराज्यीय सीमा नाक्यावरील पोलिसांना 'पीपीई कीट', नंदुरबार पोलिसांचा पुढाकार - कोरोना अपडेट
सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ११ हजारांच्यावर पोहोचली आहे. त्यातच लोकांनी बाहेर निघू नये आणि दुसऱ्या राज्यातील लोकांनी आपल्या राज्यात प्रवेश करू नये यासाठी पोलीस रात्रंदिवस कार्यरत आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना पीपीई कीट देण्यात आले आहे.
nandurbar police ppe kit corona update कोरोना अपडेट नंदुरबार पोलीस
तपासणी नाक्यावर येणाऱ्या वाहनांमधील नागरिकांशी या कर्मचाऱ्यांचा संपर्क येतो. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. त्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांची खबरदारी म्हणून सीमा तपासणी नाक्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना पीपीई कीट दिले. यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.