नंदुरबार - वाहनांना कर्णकर्कश आणि आवाजी सायलेन्सर लावत ध्वनीप्रदूषण करणाऱ्या बुलेट चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी अचानक सुरू केलेल्या या मोहिमेत दिवसभरात आठ जणांवर कारवाई करुन दंड ठोठावण्यात आला आहे.
वाहतूक शाखेची धडक मोहीम
गेल्या वर्षाभरात बुलेट मोटारसायकल वापर करणारे काहीजण मोठे आवाज करणारे सायलेन्सर लावत शहरात हिंडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यातून मोठमोठ्या आवाजाच्या सायलेन्समधून अचानक निघणारे फटाके इतरांना त्रासदायक ठरत होते. याबाबत सातत्याने तक्रारी केल्या जात होत्या.
या ठिकाणी झाली कारवाई
यांतर्गत शहरातील नेहरु चौक, बसस्थानक, अंधारे चौक, गांधी पुतळा, धुळे चौफुली, करण चौफुली याठिकाणी ही कारवाई झाली. कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सायलेन्सरप्रकरणी 200 रुपयांचा दंड आहे. परंतु, हा दंड करण्याऐवजी सायलेन्सर बदलण्याचे आदेश वाहतूक शाखेकडून देण्यात आले.