नंदुरबार: महागाई भत्ता व सातवा वेतन आयोगाच्या दुसर्या हप्त्याची रक्कम काढून देण्यासाठी दोन हजाराची लाच घेताना नंदुरबार पंचायत समितीच्या (Nandurbar Panchayat Samiti) शिक्षण विभागातील कनिष्ठ सहाय्यकाला रंगेहाथ पकडण्यात आले. (junior assistant caught taking bribe). ही कारवाई नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Nandurbar Anti Bribery Department) केली.
Nandurbar Panchayat Samiti: पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यकाला लाच घेतांना रंगेहाथ पकडले
महागाई भत्ता व सातवा वेतन आयोगाच्या दुसर्या हप्त्याची रक्कम काढून देण्यासाठी दोन हजाराची लाच घेतांना नंदुरबार पंचायत समितीच्या (Nandurbar Panchayat Samiti) शिक्षण विभागातील कनिष्ठ सहाय्यकाला रंगेहाथ पकडण्यात आले. (junior assistant caught taking bribe). ही कारवाई नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Nandurbar Anti Bribery Department) केली.
पंचायत समिती शिक्षण विभागात कारवाई:नंदुरबार येथील पंचायत समितीतील शिक्षण विभागाकडे तक्रारदाराचे जानेवारी 2022 पासून तीन टक्के महागाई भत्त्याचा फरक व सातव्या वेतन आयोगाच्या दुसर्या हप्त्त्याचे बील घेणे बाकी होते. परंतू ही रक्कम काढून देण्यासाठी शिक्षण विभागातील कनिष्ठ सहाय्यक प्रकाश गोविंदा निकवाडे यांनी तक्रारदाराकडून पाच हजाराच्या लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 2 हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदार यांनी नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
सापळा रचुन पकडले : या तक्रारीची दखल घेत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला असता पंचायत समितीच्या कार्यालयाच्या भिंतीला लागून असलेल्या एका चहाच्या दुकानावर तक्रारदाराकडून 2 हजार रुपयांची लाच घेतांना कनिष्ठ सहाय्यक प्रकाश गोविंद निकवाडे (रा.वर्शी, ता. शिंदखेडा) यास रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.ही कारवाई नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधिक्षक राकेश चौधरी, पोलिस निरीक्षक समाधान वाघ आणि पोलिस निरीक्षक माधवी वाघ यांच्या सहकार्याने करण्यात आली.