महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये झोपडीवर वीज कोसळली ; १ ठार - नंदुरबार परतीचा पाऊस बातमी

तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू झाला आहे. आज सोमवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटात शहादा तालुक्यात काही भागात पावसाला जोरदार सुरुवात झाली. त्यावेळी शहाणा बडी गावातील झोपडीवर अचानक वीज कोसळली.

झोपडीवर वीज कोसळल्याने १ ठार ५ जखमी

By

Published : Sep 23, 2019, 11:57 PM IST

नंदुरबार- येथील शहादा तालुक्यातील शहाणा बडी गावात अचानक वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत १ जण ठार तर ४ जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे.

झोपडीवर वीज कोसळल्याने १ ठार ५ जखमी

हेही वाचा-आयएनएक्स मीडिया प्रकरण : पी. चिदंबरम यांच्या वकिलाचे दिल्ली उच्च न्यायालयाला प्रत्युत्तर..

गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू झाला आहे. आज सोमवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटात शहादा तालुक्यात काही भागात पावसाला जोरदार सुरुवात झाली. त्यावेळी शहाणा बडी गावातील झोपडीवर अचानक वीज कोसळली. या दुर्घटनेत तेरसिंग रुपला पावरा (६०) हे गंभीर भाजल्याने मृत झाले. तर रिना देवसिंग पावरा (१५), समीर दल्या पावरा (७) समित्रा दल्या पावरा (११), सेवीबाई रामा पावरा (२८), जयवंती दल्या पावरा यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय पथक त्यांच्यावर उपचार करीत आहेत. या दुर्घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे.

वीज कोसळताच गावात मोठा आवाज आला होता. घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. युवकांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details