नंदुरबार - शहरात यावर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याची नवीन परंपरा जोपासली गेली आहे. त्यालाच अनुसरून यंदा शहरात ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वारकरी परंपरेनुसार गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.
नंदुरबार शहरात वारकरी परंपरेनुसार गणेशाची विसर्जन मिरवणूक हेही वाचा... सर्वत्र गणेश विसर्जनाचा उत्साह असताना लातुरात मात्र गणेश संकलन
साक्री नाका परिसरातील गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम
नंदुरबार शहरातील साक्री नाका परिसरातील गणेश मंडळाने यावर्षी गुलाल न उडवण्याचा संकल्प करीत तसेच ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वारकरी परंपरेनुसार गणेश विसर्जन मिरवणुकीचे आयोजन केले होते. यावेळी विठोबा, तुकोबारायांची भजने म्हणत गणेश मंडळाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामुळे वारकरी संप्रदायाची ही मिरवणूक नंदुरबारच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण ठरत आहे.
हेही वाचा... प्रदूषण टाळण्यासाठी गणेश मूर्तींचे संकलन; धुळ्यातील शिवदुर्ग प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम