महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आठवडे बाजाराला बंदी असतानाही बाजारपेठेत गर्दी ; नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई

नंदुरबार येथे आठवडे बाजाराला बंदी असतांनाही बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन व विनामास्क फिरताना आढळुन आलेल्या व्यक्तींवर नंदुरबार नगरपालिकेच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली.

नंदुरबार कोरोना अपडेट
नंदुरबार कोरोना अपडेट

By

Published : Jul 1, 2020, 1:37 PM IST

नंदुरबार - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आठवडे बाजाराला बंदी असतानाही खरेदी-विक्रीसाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगसह प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने अखेर नंदुरबार नगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई नगरपालिकेच्या पथकाने केली.

जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढले आहेत. जिल्ह्यात बाधितांचा आकडा 163 वर पोहोचला असून प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना नियमही लागु केले आहेत. आठवडे बाजाराला बंदी असतांनाही बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन व विनामास्क फिरताना आढळुन आलेल्या व्यक्तींवर नंदुरबार नगरपालिकेच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली.

पालिकेकडुन कारवाईसाठी चार पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकाने बाजारपेठेसह शहरातील वर्दळीच्या भागात जावुन नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली. सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यांवर 500 रुपयांचा दंड, विनामास्क आढळल्यास 1000 दंड, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणार्‍यांना 500 रुपयांचा दंड याप्रमाणे पथकाने दंडात्मक कारवाई केली आहे.

पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.बाबुराव बिक्कड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख राजेश परदेशी, राजेंद्र पाखले, अनिल सोनार, राजेश श्रीमाळ, कल्याणसिंग ठाकुर, नसीनबानो पिंजारी, वंदना मराठे, राजाराम साबळे, मनिषा भापकर, अजित सोनवणे, नागुबाई नाईक, वसंत पेंढारकर, निखील तांबोळी, गंगाबाई पराडके, अख्तरखान पठाण, उज्वला अहिरे, शशिकांत वाघ, बेबीबाई कडवे, सायली बाविस्कर, महेंद्र परदेशी यांच्या पथकाने केली.

ABOUT THE AUTHOR

...view details