नंदुरबार -गेल्या मार्चमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. या लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरणकडून ग्राहकांना अखंडीतपणे वीजपुरवठा करण्यात आला. एप्रिल 220 ते जानेवारी 2021 या दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 4 हजार 444 ग्राहकांनी वीजबिल थकवले आहे. 779.63 कोटींचे वीजबिल थकले आहे. वीजबिल न भरल्यास वीज कनेक्श कापण्याचा इशारा महावितरणकडून देण्यात आला आहे.
घरगुती वीज ग्राहकांकडे 25 कोटींची थकबाकी
जिल्ह्यात एकूण 47,559 घरगुती विद्युत ग्राहकांनी वीजबिल थकवले आहे. त्यांच्याकडे 25 कोटी 45 लाखांची थकबाकी असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. गेल्या दहा महिन्यांपासून संबंधित ग्राहकांनी विद्युत बिल भरले नसल्यामुळे याचा बोजा वीज वितरण कंपनीवर पडला आहे. यात व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांकडे लाखो रुपयांचे वीजबिल थकले असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.