नंदुरबार -जिल्ह्यातील आदिवासी भागातील शेतकरी झेंडू फुलांची शेती करीत असतात. दिवाळीत या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते, त्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत असतो. मात्र यावेळी परतीचा पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा फटका झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.
खराब हवामानाचा नंदुरबारमधील शेतकऱ्यांना फटका हेही वाचा... क्यार चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला धोका, अतिवृष्टीचाही इशारा
मागणी वाढली पण उत्पादनात घट
जिल्ह्यात परतीचा पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर ढगाळ वातावरणाचा फटका पिकाला बसला आहे. ढगाळ वातावरणामुळे झेंडूच्या झाडावर मोठ्या प्रमाणात अळ्या पडत असून त्याचा उत्पादनावर परिणाम होत आहे. पावसामुळे अनेक भागात फुले खराब होण्यास सुरुवात झाली आहे. हाता तोंडाशी आलेला घास निघून गेल्याने झेंडू उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. ऐन दिवाळीत झेंडूच्या उत्पादनात घट झाल्यामुळे, झेंडू फुलांची मागणी असूनही उत्पादनात घट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
हेही वाचा... नंदुरबारमधून भाजपचे डॉ. विजय कुमार सहाव्यांदा विजयी