नंदुरबार- महाराष्ट्रात उद्या (सोमवार) २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. नंदुरबार येथेही मतदानाची प्रकिया पार पडणार असून निवडणुकीची पूर्व तयारी झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी दिली.
नंदुरबारमध्ये निवडणुकीची तयारी पूर्ण; उद्या मतदान - undefined
मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे आणि मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी मतदारांना केले आहे.
नंदुरबार लोकसभा निवडणूक
विधानसभा मतदारसंघांनुसार कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात रविवारी सकाळीच कर्मचारी रवाना होणार आहेत. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ७० हजार ११७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मतदारसंघात ६ आदर्श मतदारसंघ तर, ७ सखी मतदारसंघ असणार आहेत. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे आणि मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी मतदारांना केले आहे.
TAGGED:
नंदुरबार लोकसभा निवडणूक