महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kartik Swamy Temple : वर्षातून एकदाच उघडणारे मंदिर बघितले आहे का?; वाचा मंदिराबद्दल... - वर्षातून एकदा उघडणारे मंदीर बघितले आहे का

जिल्ह्यातील दक्षिण काशी तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या प्रकाशा, ता.शहादा येथील कार्तिक स्वामींचे मंदिर वर्षातून एकाच (Kartik Swamy temple opens on one day in year) दिवशी उघडते. यंदा हे मंदिर कार्तिक पौर्णिमेला भाविकांसाठी (this temple was opened for devotees Kartik Poornima) खुले करण्यात आले. मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. या मंदिराचे वाशिष्ट्ये म्हणजे या मंदिरात गणपती आणि कार्तिक स्वामी यांची स्वयंभू अशी मूर्ती आहे.

Kartik Swamy Temple
कार्तिक स्वामी मंदिर

By

Published : Nov 8, 2022, 3:17 PM IST

नंदुरबार :जिल्ह्यातील दक्षिण काशी तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या प्रकाशा, ता.शहादा येथील कार्तिक स्वामींचे मंदिर वर्षातून एकाच (Kartik Swamy temple opens on one day in year) दिवशी उघडते. यंदा हे मंदिर कार्तिक पौर्णिमेला भाविकांसाठी (this temple was opened for devotees Kartik Poornima) खुले करण्यात आले. मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. या मंदिराचे वाशिष्ट्ये म्हणजे या मंदिरात गणपती आणि कार्तिक स्वामी यांची स्वयंभू अशी मूर्ती आहे. एकाच पाषाणात या दोन हि मुर्त्या कोरण्यात आल्या आहेत. अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचे बांधकाम केल्याचे सांगितले जाते. कृतिका नक्षत्र संपेपर्यत उघडे राहणार आहे. भाविक कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी मोठय़ा संख्येने येतात. खास करून महिलांची संख्या लक्षणीय असते. या दिवशी भाविक मोराचे पीस घेऊन कार्तिक स्वामींच्या मूर्तीला स्पर्श करून एक तेथे ठेवतात, तर दुसरे पीस सोबत घरी नेतात.

प्रतिक्रिया व्यक्त करतांना नागरिक

हजारो भाविकांनी घेतले दर्शन :वर्षातून एकदाच मंदिर उघडलेल्या कार्तिकी स्वामींचे दर्शन हजारो भाविकांनी घेतले. कार्तिकी पौर्णिमेनिमित्त प्रकाशात दुपारपासूनच भाविकांची गर्दी झाल्याने, सायंकाळी 4.15 मिनीटांनी कार्तिकीस्वामींची मंदीर उघडले. यावेळी मोरपीस घेवून भाविकांनी कार्तिकी स्वामींचे दर्शन घेतले. तसेच दिनांक 8 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजता पुन्हा एक वर्षासाठी कार्तिकी स्वामींचे मंदीर बंद करण्यात येणार आहे.



प्रसिद्ध कार्तिक स्वामींचे मंदिर :शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे कार्तिकी स्वामींचे मंदिर आहे. दरवर्षी कार्तिकी पौर्णिमेला एका दिवसासाठी हे मंदीर उघडत असते. काल कार्तिकी पौर्णिमेनिमित्त मंदिराचे कार्याध्यक्ष रमेश माळीच, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, सरपंच राजनंदनी भिल, जि.प.सदस्य भारतीबाई, अरुण मट्या भिल आदींच्या हस्ते कार्तिक स्वामी मंदिराचे द्वार उघडण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनी कार्तिकी स्वामींच्या दर्शनासाठी गर्दी केल्याने मोठ्या रांग्या लागल्या होत्या. मंदिरात यजमान, मानकरी, ट्रष्टी यांच्या हस्ते कार्तिक स्वामी, गणपती, शिवलींगाची पूजाअर्चा धार्मिक विधी करण्यात आली.



यंदा होणार दोन दिवस दर्शन :यावर्षी एक दिवस व दोन रात्र कार्तिक पौर्णिमेचे महत्व असल्याने, त्या अनुषंगाने भाविकांना जास्त वेळ दर्शनासाठी मिळणार आहे. मंदिर 8 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजता पुन्हा बंद करण्यात येणार आहे. यानिमित्त मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण दिसून येत आहे. मंदिर परिसरात पूजेचे धामिर्क साहित्य, मोर पिसांचा बाजार भरला आहे. खेळणी, पालख्या यांनीसुध्दा दुकाने थाटली आहेत. एकलव्य सामाजिक गणेश मंडळाने भाविकांसाठी मोफत भंडारा प्रसाद वाटपाची व्यवस्था केली आहे. धुळे येथील मिल्ट्रीचे सेवानिवृत्त देवेन्द्र युवराज हिरे यांनी सपत्नीक होमकुंडची हवन पूजा विधी केली. यावेळी सुनील संभु पाटील, रफिक खाटीक, अंबालाल कोळी, रामदास तुंबडू पाटील, ओंकार पाटील, राजाराम पाटील जयनगर, नंदलाल गिरीधर पाटील आदी उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस अधिकारी, महिला पोलीस अधिकारी माया राजपूत सह सुमारे वीस पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. स्थानिक पोलीस रामा पाडवी खंदारे, जाधव कोळी आदींनी मंदिर परिसरात चोख बंदोबस्त लावला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details