महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबार नर्मदाकाठावरील तरंगत्या दवाखान्याची दुरवस्था; आदिवासी भागातील रुग्णांवर होत होता मोफत औषधोपचार - Free Medication was Being Given to Patients

नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम ( Nandurbar Floating Hospital on Banks of Narmada ) भागातील नर्मदा काठावर असलेल्या जीवनदायी ठरलेल्या तरंगत्या दवाखान्याची अत्यंत दुरवस्था झाली ( Free Medication was Being Given to Patients in Tribal Areas ) आहे. तर बोट ॲम्बुलन्स बंद अवस्थेत पडून असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे. करोडो रुपये खर्च करून तरंगता दवाखाना सुरू करण्यात आला होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून दवाखान्याची देखभाल-दुरुस्ती झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता चक्क तरंगत्या दवाखान्याचा इलाज करणे गरजेचे झाले असल्याचे सांगितले जात आहे.

Nandurbar Floating Hospital on Banks of Narmada; Free Medication was Being Given to Patients in Tribal Areas
नंदुरबार नर्मदाकाठावरील तरंगत्या दवाखान्याची दुरवस्था; आदिवासी भागातील रुग्णांवर होत होता मोफत औषधोपचार

By

Published : Jan 4, 2023, 10:31 PM IST

नंदुरबारगेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्ती-देखभाल न झाल्याने तरंगता दवाखाना धोकादायक ( Nandurbar Floating Hospital on Banks of Narmada ) बनला आहे. अशाही जीवघेण्या आणि कधीही कुठलाही मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देणाऱ्या या तरंगत्या दवाखान्यावरून ( Free Medication was Being Given to Patients in Tribal Areas ) अतिशय तुंटपुंज्या अशा सुविधा आणि अंधारात आरोग्य व्यवस्था आपल काम चोख बजावित असून, नर्मदाकाठावरील अनेकांसाठी जीवनदायी ठरलेल्या या तंरगत्या दवाखान्याची अत्यंत बिकट दुरवस्था झाली आहे.

नंदुरबार नर्मदाकाठावरील तरंगत्या दवाखान्याची दुरवस्था; आदिवासी भागातील रुग्णांवर होत होता मोफत औषधोपचार

आदिवासी बांधवांना आरोग्य सुविधा पुरविण्याच्या अनुषंगानेनर्मदा काठावर अतिदुर्गम भागात वसलेल्या आदिवासी बांधवांना आरोग्य सुविधा पुरविण्याच्या अनुषंगाने 2005 मध्ये युरोपियन कमिशनने दोन तरंगते दवाखाने जिल्हातील आरोग्य यंत्रणेला भेट दिले. आहे हिच तरंगते दवाखाने आता अंतीम घटका मोजत असल्याचे चित्र आहे. गेल्या सतरा वर्षात घसाराच न झाल्याने तरंगत्या दवाखान्याची अवस्था देखील अतिशय बिकट झाली आहे. यातील एक दवाखाना तर २०१५ मध्येच बुडाला असुन त्याला बाहेर काढण्याची तसदी देखील प्रशासनाने घेतली नाही. तर दुसरीकडे चिमलखेडी येथे तैणात असलेल्या तरंगत्या दवाखान्याची अवस्था देखील बिकट झाली आहे.

तरंगत्या दवाखान्यातील विद्युत पुरवठा बंदअतिदुर्गम भागात रात्री अपरात्री मोठी दुर्घटना झाल्यास तरंगत्या दवाखान्यात इलाज व्हावा याकरिता करोड रुपये खर्च करून तरंगता दवाखाना, बोट ॲम्बुलन्स 2015 सारी दाखल झाली होती. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे या दवाखान्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. यातील विद्युत व्यवस्था बंद पडल्याने वैद्यकीय पथकाला रात्री अपरात्री रुग्ण आल्यास टॉर्च च्या उजेडात रुग्णांना तपासावे लागत आहे.सतरा वर्षात हे दवाखाने कधी पाण्याबाहेर काढुन त्या खालचे पत्र सडले कि व्यवस्थीत आहे. हे पाहण्याची तसदी देखील आरोग्य यंत्रणेने घेतलीच नाही.

गेल्या वर्षी माझगाव डॉकच्या अधिकाऱ्यांनी घेतला होता आढावातरंगत्या दवाखान्याबाबत होत असलेल्या तक्रारींबाबत माझगाव डॉकच्या अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षा या तरंगत्या दवाखान्याची तपासणी करून त्याच्या दुरुस्तीचा प्रस्तावही सादर केला. मात्र, दुरुस्तीच्या खर्चात नविन अत्याधुनक अशा बोट ॲम्बुलन्स येवु शकत असल्याने या युरोपीयन कमीशनने दिलेल्या दवाखान्याच्या दुरुस्तीचा विचारही आरोग्य विभागाने सोडुन दिल्याचे चित्र आहे. अशातच या धोकादायक झालेल्या तरंगत्या दवाखान्याचा वापर करुन आरोग्य यंत्रणा मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देणार का असाच काहीसा प्रश्न निर्माण होत असतांनाच, शासन स्तरावरूनच याबाबत ठोस निर्णय घेऊन नवीन बोट ॲम्बुलन्सद्वारे याभागातील आरोग्यसेवा अधिक बळकटीची गरज व्यक्त होत आहे.

चिमलखेडी येथे तैनात हा तरंगता दवाखानाचिमलखेडी येथे तैनात हा तरंगता दवाखाना जवळपास परिसरातल्या ०९ खेडे आणि पन्नासहून अधिक पाड्यांसाठी कार्यरत आहे. यावरील पथकाने सोमवारपासून ते शनिवारपर्यंत मुक्कामाचे एक वेळापत्रक तयार केले असून, त्यानुरूप प्रत्येक गावाच्या काठावर हा तरंगता दवाखाना पोहचुन याठिकाणी आरोग्य सेवा पुरवत आहे. मुळातच यातील अनेक गावांना येण्यासाठी रस्ताच नसल्यान हा दवाखानाच आपल्या आरोग्यासाठी सर्व काही असल्याचे नागरीक सांगत आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details