नंदुरबार- शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पपईची लागवड केली जाते. आता पपईची तोड सुरू झाली आहे. मात्र, पपई तोडीचा सुरुवातीचा भाव आणि आताचा भाव यांच्यात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येत आहे. पपई खरीददार व्यापारी मनमानी करत असून हमीभाव देण्यास नकार देत आहेत. भाव खूप कमी मिळत असल्यामुळे पपई उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहे.
नंदुरबारमध्ये पपईचे दर कमी झाल्याने शेतकरी आंदोलनाच्या तयारीत - Shahada Taluka papaya Farmers' Movement
शेतकऱ्यांना योग्य भाव देण्यात व्यापाऱ्यांमध्ये एकमत दिसून येत नाही. स्थानिक व्यापारी प्रति किलो ११ रुपये भाव देण्यास तयार आहेत. मात्र, परराज्यातील व्यापारी भाव देण्यास नकारात्मक भूमिका घेत असल्याने शेतकऱ्यांनी पपई तोड बंद करण्याची भूमिका घेतली आहे. शहादा तालुक्यात पपई खरेदी करण्यासाठी ८० ते ९० व्यापारी गटाने येत असल्याने ते कमी भाव देत आहेत.

शेतकऱ्यांना योग्य भाव देण्यात व्यापाऱ्यांमध्ये एकमत दिसून येत नाही. स्थानिक व्यापारी प्रति किलो ११ रुपये भाव देण्यास तयार आहेत. मात्र, परराज्यातील व्यापारी भाव देण्यास नकारात्मक भूमिका घेत असल्याने शेतकऱ्यांनी पपई तोड बंद करण्याची भूमिका घेतली आहे. शहादा तालुक्यात पपई खरेदी करण्यासाठी ८० ते ९० व्यापारी गटाने येत असल्याने ते कमी भाव देत आहेत. त्यामुळे, शेतकऱ्यांनी पपई तोड बंद करण्याची भूमिका घेतली आहे. शहादा तालुक्यात मागील तीन वर्षापासून पपईच्या दरावरून तीव्र आंदोलन झाले होते. यावर्षी शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत. एकूणच पपई दरावरून नंदुरबार जिल्ह्यात शेतकरी आक्रमक झाले आहेत. येत्या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचीही शक्यता आहे. पपई उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव न मिळाल्यास ते आंदोलनाचा पवित्रा उचलणार आहे.
हेही वाचा-नंदुरबारमध्ये पतंग उडविणार्या मुलाचा तोल जाऊन मृत्यू