महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित बंडखोरीच्या मार्गावर - Nandurbar rajendrakumar gavit NCP

लोकसभा निवडणुकीत त्यांनी आघाडीसाठी प्रयत्न केले होते. मात्र, काँग्रेसचे पद्माकर वळवी यांचा मागील निवडणुकीत अवघ्या 700 मतांनी पराभव झाल्याने या जागेवरील हक्क काँग्रेसने सोडला नाही. त्यामुळे गावित यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. गावित हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू आहेत. या मतदारसंघात विजयकुमार गावित यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे विजयकुमार गावित काय भूमिका घेतात यावर या मतदारसंघातील राजकीय गणिते अवलंबून राहणार आहे.

राजेंद्रकुमार गावित

By

Published : Sep 27, 2019, 10:54 AM IST

Updated : Sep 27, 2019, 8:38 PM IST

नंदुरबार - विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येत आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी उमेदवारी मिळणार नसल्याने पक्षाला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघात पाहण्यास मिळू शकतो. राजेंद्र गावित यांनी पक्ष सोडल्यानंतर या मतदारसंघातील राजकीय समीकरणे कशी बदलतात हे सांगणारा ईटीव्ही भारतचा एक खास रिपोर्ट...

नंदुरबार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित बंडखोरीच्या मार्गावर

हेही वाचा -शिवसेना, भाजपमधील नाराजांवर मनसेची नजर

2014च्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र कुमार गावित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत त्यांना 46 हजार 966 मते मिळाली होती. ते तिसऱ्या स्थानी होते. पाच वर्षात त्यांनी या मतदारसंघात मोठा जनसंपर्क वाढविला आहे. याबरोबरच गावित यांच्या शिक्षण संस्थांचे जिल्हाभरात मोठे जाळे आहे. त्यांच्या या निर्णयामुळे त्याचा परिणाम आघाडीवर होणार, हे नक्की.

हेही वाचा -पीएमसी बँक प्रकरणी किरीट सोमैया यांची आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार

लोकसभा निवडणुकीत त्यांनी आघाडीसाठी प्रयत्न केले होते. मात्र, काँग्रेसचे पद्माकर वळवी यांचा मागील निवडणुकीत अवघ्या 700 मतांनी पराभव झाल्याने या जागेवरील हक्क काँग्रेसने सोडला नाही. त्यामुळे गावित यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. गावित हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू आहेत. या मतदारसंघात विजयकुमार गावित यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे विजयकुमार गावित काय भूमिका घेतात यावर या मतदारसंघातील राजकीय गणिते अवलंबून राहणार आहे.

हेही वाचा -माझ्याकडील पुराव्यात शरद पवार यांचे नाव नव्हेच - अण्णा हजारे

शहादा विधानसभा मतदारसंघात राजेंद्र गावित यांच्यामुळे आघाडीत बिघाडी झाली आहे. मात्र, युतीची अवस्थाही त्याचप्रमाणे आहे. विद्यमान आमदारांच्या मुलाने वडिलांच्या उमेदवारीच्या विरोधात पक्षाकडे उमेदवारी मागितले आहे. भाजपचे उदेसिंग पाडवी यांच्या पाठीशी उभी राहिली तर त्यांचा मुलगा राजेश पाडवी यांची भूमिका काय राहील, त्याचप्रमाणे राजेंद्र गावित कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतात यावर या निवडणुकीचे भवितव्य समजणार आहे.

Last Updated : Sep 27, 2019, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details