नंदुरबार:आदिवासी बहुल जिल्हा अशी ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबारमध्ये कमी झालेले लसीकरण जिल्हा प्रशासनासाठी डोके दुखीचा विषय ठरला आहे. लसीकरणाचा आकडा गाठण्यात प्रशासनाला अपयश आल्याने राज्यात लसीकरणाबाबत नंदुरबारचा क्रमांक हा सर्वात शेवटी लागला. याचे प्रमुख कारण म्हणजे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मजूर स्थलांतरित होत आहेत. त्याबरोबर लसीकरणा बाबत नागरिकांमध्ये भीती असल्यामुळे लसीकरणाची टक्केवारी स्थिर राहिली.
Nandurbar Vaccination : लसीकरणाच्या टक्केवारीत नंदुरबार जिल्हा राज्यात शेवटी - गैरसमज
आदिवासी बहुल (Tribal-dominated) नंदुरबार जिल्ह्याची जानेवारीत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या (Corona vaccination) ड्रायरनसाठी निवड झाली. मात्र राज्यात सर्वात कमी लसीकरण याच जिल्हात झाले. सप्टेंबर महिन्यात फक्त 19 टक्के लसीकरण झाले होते. भौगोलीक परिस्थीती, (Geographical conditions) आदिवासी भागातील गैरसमज (Misunderstanding) अशा विपरीत परिस्थीतींवर मात करत सध्या प्रशासन लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी सकाळी लवकर तसेच रात्री दहापर्यंत मोहीम सुरू ठेवली आहे.
दुसरा डोस ३४.०४ टक्केच
जिल्ह्यात १४ लाख २० हजार २०० लोकांच्या लसीकरणाचे उदिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी ०९ लाख ०५ हजार ४४७ नागरीकांनी पहिला डोस घेतला. हे प्रमाण ७१ टक्के इतके आहे. ४ लाख ६३ हजार ३६१ नागरींकाचा दुसरा डोस पुर्ण झाला आहे. दुसऱ्या डोसची टक्केवारीचे प्रमाण ३४.०४ टक्के इतकेच आहे. जानेवारीमध्ये सुरु झालेल्या लसीकरणाची ऑगस्ट पर्यतची आकडेवारी पाहता जिल्ह्यात आठ महिन्यात अवघे ३७.७४ टक्केच लसीकरण झाले होते. प्रशासनाने केलेल्या उपाय योजनांमुळे पुढच्या तीन महिन्यात ३३.४० टक्के लसीकरण झाले. यावरुनच प्रशासन लसीकरणाबाबत घेत असलेल्या मेहनतीची प्रचिती आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांनी सांगितले.
ग्रामीण भागात जनजागृती आवश्यक
मुळातच आदिवासी बहुल भागात सुरुवातीपासुन लसीकरणाबाबत अफवां पसरल्या त्यामुळे नागरीकांनी लस घेणे टाळले. आजही अनेक जण लस घेण्यास टाळाटाळ करतात. तर दुसरीकडे भौगोलीक खडतर परिस्थीती, वाड्या वस्तांवर जाण्यासाठी नसलेले रस्ते, जिल्ह्यातुन मजुरी साठी होणारे स्थलांतराचे मोठे प्रमाण ही पण कमी लसीकरणाचे महत्वाचे कारण समोर येत आहे. याबाबत जिल्हा प्रशासन विविध प्रकारे जनजागृती केली जात आहे.
हेही वाचा : Sarangkheda Yatra : घोडे बाजारात दोन दिवसात 60 लाखाची उलाढाल 11 लाखाला विकला 'कोहिनूर'व्यक्त होत आहे.