नंदुरबार -जिल्ह्यात सध्या एकही ॲक्टिव्ह रुग्ण नाही आहे. जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये कोरोना ॲक्टिव्ह रुग्णसंख्या शून्य झाल्याने आणि शेवटच्या कोरोना बाधितांचा मृत्यू होवून जवळपास पन्नास दिवसांहून अधिकचा कालावधी उलटल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील आरोग्या सुविधांच्या अभावांवर मात
आरोग्याच्या अतिशय तोकड्या सुविधा आणि त्यातही अपुरे मनुष्यबळ म्हणुन नंदुरबारची ओळख आहे. त्यामुळेच कोरोनाच्या लाटेत नंदुरबारमध्ये प्रचंड हालअपेष्टा येण्याचे संकेत वर्तवल्या जात होते. मार्च एप्रिल महिन्यात तसेच झाले. नागरिकांना जिल्ह्यात बेड आणि ऑक्सिजन मिळत नसल्याने कोरोना बाधितांचे प्रचंड हालही झाले. मात्र यानंतर अवघ्या तीनच महिन्यात नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता शुन्यावर पोहचली आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना अहवाल शून्य
गेल्या पंधरा दिवसात एकही कोरोना बाधित रूग्ण आढळून आला नसून जिल्हा सामान्य रुग्णालयात एकही कोरोना बाधित उपचार घेत नसल्याने आता तब्बल साडे चारेशहून अधिक बेड हे रिकामे आहेत. यामुळे आरोग्य यंत्रनेवरचा ताण काहीसा कमी झाला असून याबाबत एकत्रीत परिश्रमाची फलश्रुती असल्याचे यंत्रनेला वाटत आहे.
सहाही तालुके कोरोना संसर्ग मुक्त