नंदूरबार - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूधंद्याचा आणि गावठी दारुच्या हातभट्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने धडक कारवाई सत्र सुरू करण्यात आले आहे.
नंदुरबार येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूधंद्यांवर कारवाई - लोकसभा
गुजरात राज्यात दारूबंदी असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील काही तालुक्यात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची गावठी दारू तयार केली जाते. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात अवैध दारु भट्ट्यांवर धाड टाकली.
नंदुरबार जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात आहे. गुजरात राज्यात दारूबंदी असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील काही तालुक्यात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची गावठी दारू तयार केली जाते. जिल्ह्यासह गुजरात राज्यातही ही दारू पाठवले जाते. आदर्श आचारसंहितेप्रमाणे निवडणूक काळात दारूचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात अवैध दारु भट्ट्यांवर धाड टाकली.
दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे जवळपास तीन लाख लिटर कच्चे रसायन नष्ट केले आणि तयार हातभट्टीची गावठी दारू नष्ट केली आहे. तसेच मध्यप्रदेशमध्ये बनावटीची विनापरवानगी दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करत ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व्यावसायिकांच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या या धाडसत्रामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.