नंदुरबार- धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात सातपुडाच्या पर्वत रंगेतील तिनसमाळ गावात अतिवृष्टीने शेती, जनावरे, रस्ते, छोटे पूल पावसाच्या पाण्यात वाहून गेले होते. यामुळे आदिवासी ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. या पार्श्वभूमीवर सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात २० किलोमीटरची पायपीट करून जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी पूरग्रस्तांची पाहणी केली.
नंदुरबार : २० किलोमीटरची पायपीट करून जिल्हाधिकाऱ्यांनी केली पूरग्रस्तांची पाहणी - तिनसमाळ
पंतप्रधान सडक योजने अंतर्गत १० कोटी रूपये खर्च करून निकृष्ठ दर्जाचा रस्ता खराब झाल्याने तिनसमाळ गावातील ग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे. धडगाव जाण्यासाठी मोठी कसरत करून पायपीट करावी लागत आहे.
पंतप्रधान सडक योजने अंतर्गत १० कोटी रूपये खर्च करून निकृष्ठ दर्जाचा रस्ता खराब झाल्याने तिनसमाळ गावातील ग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे. धडगाव जाण्यासाठी मोठी कसरत करून पायपीट करावी लागत आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे तक्रार केली होती.
विलंब न करता जिल्हाधिकारी यांनी २० किलोमीटरची पायपीट करत तीन पर्वत चढून तिनसमाळ गावातील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांची शेती पाण्यात वाहून गेल्याने पंचनामा करून नुकसान भरपाई देणार असल्याची माहिती दिली.