नंदुरबार - जिल्ह्यात दहा हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर मिरचीची लागवड केली जाते. नंदुरबार बाजार समितीमध्ये दरवर्षी दीड लाख क्विंटल पेक्षा अधिक लाल मिरचीची खरेदी होत असते. त्यामुळे राज्य शासनाने दहा वर्षांपूर्वी याठिकाणी चिली पार्क तयार करण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्यापही ही घोषणा कागदावरच आहे.
नंदुरबारमध्ये राज्यशासनाकडून 'चिली पार्क'ची घोषणा; दहा वर्षानंतरही पार्क कागदावरच - राज्यशासन चिली पार्क घोषणा
मिरचीवरील प्रक्रिया उद्योग आणि संशोधन त्याचसोबत मिरची कोरडी करण्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर आणि एकाच ठिकाणी मिरची उद्योगाचा विकास करण्यासाठी दहा वर्षापूर्वी राज्यसरकारने चिली पार्कची घोषणा केली. मात्र, अजूनही नंदुरबारचे चिली पार्क कागदावरच आहे. चिली पार्कचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र, सरकारला याकडे लक्ष देण्यास वेळ नाही.
जिल्ह्यासह शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेशच्या भागात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पन्न घेतले जाते. नंदुरबार जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात मिरची उत्पादन होत असताना मिरचीवर कुठल्याही प्रकारचा प्रक्रिया उद्योग नाही. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने मिरचीचा व्यापार होतो. जिल्ह्यात पार्क झाल्यास त्याचा त्यातून मिरचीवर प्रक्रिया करणारे उद्योग नंदुरबारमध्ये येतील. त्यात काही उद्योगांमध्ये हिरव्या मिरचीवर प्रक्रिया केली जाईल, तर काही उद्योग लाल मिरचीवर प्रक्रिया करतील. त्यासोबत नंदुरबारमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा असल्याने विदेशात मिरची पावडर निर्यात करताना गुणवत्ता तपासणी एकाच ठिकाणी होणार असल्याने त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे. हिरव्या मिरचीत काही औषधी गुणधर्म असतात. त्याच्यावर संशोधन झाल्यास मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
मिरचीवरील प्रक्रिया उद्योग आणि संशोधन त्याचसोबत मिरची कोरडी करण्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर आणि एकाच ठिकाणी मिरची उद्योगाचा विकास करण्यासाठी दहा वर्षापूर्वी राज्यसरकारने चिली पार्कची घोषणा केली. मात्र, अजूनही नंदुरबारचे चिली पार्क कागदावरच आहे. चिली पार्कचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र, सरकारला याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. चिली पार्क अस्तित्वात आला, तर शेतकऱ्यांसमोर अनेक पर्याय उपलब्ध होतील आणि मिरचीला योग्य भाव मिळेल. मात्र, आता राज्यशासन चिली पार्क तयार करण्याकडे लक्ष देईल का, हाच प्रश्न आहे.