महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभा रणकंदन: नंदुरबारमध्ये कोण मारणार बाजी? - nandurbar assembky news

जिल्ह्यातील नंदुरबार मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या मतदार संघात भाजपचे विजयकुमार गावित विरुद्ध काँग्रेसचे उदेसिंह पाडवी याच्यात लक्षवेधी लढत झाली आहे. त्यामुळे येथील जनता कोणाच्या पारड्यात मताधिक्य जास्त देऊन उमेदवाराला निवडूण आणते याची उत्सुकता लागली आहे.

नंदुरबारमध्ये कोण मारणार बाजी?

By

Published : Oct 23, 2019, 2:55 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यातील सर्व चार विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत. 2014 मध्ये सत्ताधारी भाजपकडे येथील दोन जागा आणि काँग्रेसकडे दोन जागा निवडूण आल्या होत्या. गेल्या निवडणुकीत भाजपने या जिल्ह्यात मोठं यश मिळवले होते. शिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या डॉ. हीना गावित यांनी विजय मिळवला होता.

नंदुरबारमध्ये कोण मारणार बाजी?

हेही वाचा-विधानसभा रणकंदन : जळगाव जिल्हा कुणाच्या पदरात?

जिल्ह्यातील नंदुरबार मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या मतदार संघात भाजपचे विजयकुमार गावित विरुद्ध काँग्रेसचे उदयसिंह पाडवी याच्यात लक्षवेधी लढत झाली आहे. त्यामुळे येतील जनता कोणाच्या पारड्यात मताधिक्य जास्त देऊन उमेदवाराला निवडणून आणते हे पाहावे लागणार आहे.

अक्कलकुवा मतदारसंघ - या विधानसभा मतदारसंघात 2014 च्या निवडणूकीत 70.91 टक्के एवढे मतदान झाले होते. काँग्रेसच्या केसी पाडवी यांचा विजय झाला होता. पाडवी यांची थेट लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पराडके यांच्याशी होती. त्यांचा 15 हजार 775 मतांनी पराभव झाला होता. यावेळी या मतदारसंघात 72.68 टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघा शिवसेनेच्या आमशा पडवी विरुद्ध काँग्रसचे अ‌ॅड. के.सी पाडवी याच्यात लढत झाली आहे.

हेही वाचा-ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून काँग्रसेची देशभर आंदोलने


शहादा मतदारसंघ- या विधानसभा मतदारसंघात 2014 च्या निवडणूकीत 65.19 टक्के एवढे मतदान झाले होते. भाजपच्या उदयसिंह कचरु यांचा यावेळी विजय झाला होता. त्यांची लढत काँग्रेसचे पद्माकर वळवी यांच्याशी होती. पद्माकर यांचा हजार 719 मतांनी पराभव झाला होता. यावेळी या मतदारसंघात 65.31 टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघात भाजपचे राजेश पडवी विरुद्ध काँग्रसचे पद्माकर वळवी याच्यात थेट निवडणूक झाली आहे.

हेही वाचा-सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या बॅनर्जींच्या विचाराशी सहमत नाही - जयराम रमेश

नंदूरबार मतदारसंघ - या विधानसभा मतदारसंघात 2014 च्या निवडणूकीत 62.1 टक्के एवढे मतदान झाले होते. या मतदारसंघातून भाजपच्या विजय कुमार गावित यांनी विजय मिळवला होता. त्यांनी काँग्रेसचे कुणाल वसावे यांचा पराभव केला होता. यावेळी या मतदारसंघात 55.28 टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघात भाजपचे विजयकुमार गावित विरुद्ध काँग्रसचे उदयसिंह पाडवी यांच्यात चुरशीची लढत झाली आहे.

हेही वाचा-माजी आमदार अनिल गोटे मतमोजणीपर्यंत देणार ईव्हीएम मशीनजवळ पहारा

नवापूर मतदारसंघ- या विधानसभा मतदारसंघात 2014 च्या निवडणूकीत 74.39 टक्के एवढे मतदान झाले होते. या मतदारसंघातून काँग्रेसचे सुरुपसिंह नाईक यांना विजय मिळवला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद गावित यांचा पराभव केला होता. यावेळी या मतदारसंघात 73.65 टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघात भाजपचे भरत गावित विरुद्ध काँग्रसचे शिरीष नाईक याच्यात लढत झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details