महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अवैधरित्या कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर प्रशासनाची कारवाई - Nandurbar illegal corona center

शासनमान्यता प्राप्त कोविड रुग्णालय नसताना कोविड रुग्णांवर अ‍ॅप्पल हॉस्पिटलमध्ये उपचार होत असल्याचे निदर्शनास आल्याने उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांना सदर हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. प्रांत अधिकारी यांच्या आदेशावरून तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, मुख्याधिकारी राहुल वाघ आणि तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र वळवी यांच्यासमवेत रुग्णालयाची पाहणी केली.

नंदुरबार अवैध कोरोना
नंदुरबार अवैध कोरोना

By

Published : Apr 22, 2021, 6:18 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यातील शहादा शहरात कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाची मान्यता नसतानादेखील उपचार सुरू असल्यामुळे व रुग्णांकडून वाजवीपेक्षा जास्त बिल आकारल्याप्रकरणी शहादा तालुका उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र वळवी, तहसीलदार मिलिंद कुळकर्णी, मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या समवेत ॲपल रुग्णालयातील परिस्थितीची पाहणी केली असता मान्यता नसताना देखील कोविड रुग्णांवर उपचार सुरू असल्यामुळे रुग्णालय कोविड रुग्णांच्या उपचाराचे मान्यता प्राप्त करत नाही तोपर्यंत रुग्णालय सील करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी दिली आहे.

मान्यता नसताना केला कोविड रुग्णांवर उपचार -

शासन मान्यताप्राप्त कोविड रुग्णालय नसताना कोविड रुग्णांवर अ‍ॅप्पल हॉस्पिटलमध्ये उपचार होत असल्याचे निदर्शनास आल्याने उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांना सदर हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. प्रांत अधिकारी यांच्या आदेशावरून तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, मुख्याधिकारी राहुल वाघ आणि तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र वळवी यांच्यासमवेत रुग्णालयाची पाहणी केली. या ठिकाणी इतर रुग्णासोबत कोविड बाधितांवर उपचार होत असल्याचे निदर्शनास आले. अशाने प्रशासनाच्या कोविड प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये बाध निर्माण होत असल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि भारतीय दंड संहितेतील तरतुदीप्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दाखल रुग्णांची स्थिती पाहून त्यांना उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल करावे आणि रुग्णालय चालविण्यासाठी आवश्यक अनुमती सक्षम प्राधिकार्‍याकडून घेईपर्यंत रुग्णालय सील करण्यात यावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जास्त बिल आकारल्या प्रकरणी प्रशासनाकडून नोटीस -

शहादा शहरातील सार्थक हॉस्पिटल मध्ये रुग्णांकडून जास्त बिल आकारल्याच्या तक्रारीमुळे तपासणी सुरू असून लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. मान्यता प्राप्त होईल केअर सेंटर व खाजगी रुग्णालयांनी शासनाच्या नियमांचे पालन करून रुग्णांना सेवा द्यावी असे आव्हान उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details