नंदुरबार - शहादा तालुक्यातील रायखेड येथून गावी परतणारी चारचाकी रस्त्यावर उभ्या असणाऱ्या ट्रॉलीवर धडकल्याने आईसह तीन वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. नातलगांकडे गोंधळाचा कार्यक्रम उरकून माघारी येत असताना सुलतानपूर फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चारचाकी ट्रॉलीवर धडकल्याने आई आणि मुलाचा मृत्यू; 5 अत्यवस्थ - car accident in nandurbar
शहादा तालुक्यातील रायखेड येथून गावी परतणारी चारचाकी रस्त्यावर उभ्या असणाऱ्या ट्रॉलीवर धडकल्याने आईसह तीन वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला.
अपघातग्रस्त कुटुंब शहादा तालुक्यातील रायखेडचे असून ते नातलगांकडे गोंधळाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री उशिरा हे कुटुंबीय चारचाकीने रायखेड गावी येण्यास निघाले. शहादा ते खेतिया रस्त्यादरम्यान सुलतानपूर फाट्याजवळ पंक्चर झालेल्या अवस्थेत कापसाची ट्रॅक्टर ट्रॉली उभी होती. भरधाव चारचाकी थेट ट्रॉलीला धडकली. यामध्ये चारचाकीचा चुराडा झाला आहे.
विद्या हर्षल शिंदे (वय 27) व आरोह हर्षल शिंदे (वय 3 वर्ष) या मायलेकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, सुरेश खंडू शिंदे (वय 60), सरोचबाई शिंदे (वय 54), हर्षल सुरेश शिंदे (वय 32), मयुर शिंदे (वय 34), यज्ञेश प्रथमेश हरदास (वय 7 ) हे पाच जण गंभीर जखमी आहेत. घटनेची माहिती मिळाल्यावर म्हसावद पोलीस ठाण्याचे कर्मचारी नामदेव बिरारे, जितु पाडवी व कर्मचार्यांसह नागरिकांनी मदतकार्य मिळवत जखमींना मिळेल त्या वाहनाने रुग्णालयात दाखल केले. हा अपघात इतका भीषण होता, की कार चक्काचूर झाली आहे. याप्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.