महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये आशा सेविकांचे पंधरा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे

आशा सेविकांच्या विविध मागण्यासाठी आयटक संघटनेच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. गेल्या १५ दिवसांपासून आंदोलकर्ते प्रशासनाला जागे करण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र, जिल्हा प्रशासन आणि राज्यसरकार याकडे लक्ष देत नसल्याने निदर्शना येत आहे.

तब्बल पंधरा दिवसांपासून आशासेविकांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

By

Published : Sep 17, 2019, 8:24 PM IST

नंदुरबार - आशा सेविकांच्या विविध मागण्यांसाठी आयटक संघटनेच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. गेल्या १५ दिवसांपासून आंदोलकर्ते प्रशासनाला जागे करण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र, जिल्हा प्रशासन आणि राज्यसरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी आशा सेविकांनी तीव्र आंदोलन केले आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू राहील असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

हेही वाचा - आशा सेविकांचा वेतनवाढीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार!

ग्रामीण भागातील आरोग्यसेवेत मोठी भूमिका बजावणाऱ्या आशा सेविकांच्या मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची भावना राज्यभरात दिसून येत आहे. मानधन वाढीचा प्रश्न गेले अनेक महिने रेंगाळत आहे. अल्प मानधनावर आशा सेविका व गटप्रवर्तकांना काम करावे लागत हे आंदोलक रस्त्यावर उतरले.

तब्बल पंधरा दिवसांपासून आशासेविकांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

हेही वाचा - मानधनवाढीसाठी अहमदनगर आशा सेविकांचा जिल्हापरिषदेवर एल्गार

हेही वाचा - पेट्रोल-डिझेल भडकण्यास सुरुवात; जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या दरवाढीचा फटका

ABOUT THE AUTHOR

...view details