महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवापूर शहराला पाणीपुरवठा करणारे धरण ओव्हरफ्लो; नदी किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा - अतिवृष्टी

गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. परिणामी धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नदी किनार्‍यावरील गावांना धोक्याचा इशारा वर्तविण्यात येत आहे.

नवापूर शहराला पाणीपुरवठा करणारे धरण ओवरफ्लो

By

Published : Aug 3, 2019, 8:22 PM IST

नंदुरबार- नवापूर शहराला यंदाच्या दुष्काळात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली होती. पाणीटंचाईमुळे नवापूर शहरातील राजकारण चांगलेच तापले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. परिणामी धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नदी किनार्‍यावरील गावांना धोक्याचा इशारा वर्तविण्यात येत आहे.

नवापूर शहराला पाणीपुरवठा करणारे धरण ओवरफ्लो

काही दिवसांपासून धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर असल्यामुळे या धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. तर शहराला पाणीपुरवठा करणारी रंगावली नदीवरील नागझिरी धरण ओवरफ्लो झाले आहे. पुढचे काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी १७ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीत रंगावली नदीला अचानक महापूर आला होता. या पुरामुळे रंगावली किनाऱ्यालगत असलेल्या गावांना पुराचा मोठा फटका बसला होता. दरम्यान, आता नागझिरी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करून नदीकिनाऱ्याजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्याची आवश्यकता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details