नंदुरबार- गणेश विसर्जनानिमित्त शहरातील तूप बाजारातील बाबा गणपती मंडळाने विसर्जन मिरवणूक काढली. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. मोहरम व गणेशोत्सव एकत्र आल्याने मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन मोहरम व गणेश विसर्जन मिरवणूक एकत्र साजरी करून एकात्मतेचा संदेश दिला.
शहादा येथे राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन; मुस्लीम बांधवांनी केले गणेश विसर्जन
शहरात मुस्लीम बांधवांकडून काढण्यात आलेली मिरवणूक राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक ठरली आहे. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, मिरवणुकीत गुलालाचा वापर करण्यात आला नाही. पारंपरिक वाद्यांच्या तालावर हिंदू-मुस्लीम बांधवांनी तूप बाजाराच्या बाबा गणपतीला निरोप दिला.
शहरात मुस्लीम बांधवांकडून काढण्यात आलेली मिरवणूक राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक ठरली आहे. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, मिरवणुकीत गुलालाचा वापर करण्यात आला नाही. पारंपरिक वाद्यांच्या तालावर हिंदू-मुस्लीम बांधवांनी तूप बाजाराच्या बाबा गणपतीला निरोप दिला. यावेळी 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या', या घोषणांनी परिसर भक्तिमय झाला होता. मुस्लीम बांधवांनी गणेश विसर्जन मिरवणुकीवर पुष्पवृष्टी केली. यावेळी परिसरातील नागरिकांच्या वतीने मुस्लीम बांधवांना गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने लोकांना गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात आले.
हेही वाचा-नंदुरबार शहरात विठू-माऊलीच्या जयघोषात गणरायाचे विसर्जन