नंदुरबार -जिल्ह्यातील सारंगखेडा येथील अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी आदिवासी समाजातील विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ जमावाने मोर्चा काढून, आरोपीला फ़ाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. यावेळी संतप्त जमावाने खून करणाऱ्या तरुणाच्या घरावर दगडफेक करत, तोडफोड देखील केली आहे.
एकतर्फी प्रेमातून मुलीची हत्या, जमावाकडून आरोपीच्या घरावर दगडफेक - Tribal organizations
सारंगखेडा येथील अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी आदिवासी समाजातील विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ जमावाने मोर्चा काढून, आरोपीला फ़ाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. यावेळी संतप्त जमावाने खून करणाऱ्या तरुणाच्या घरावर दगडफेक करत, तोडफोड देखील केली आहे.
सारंगखेडा येथे गुरुवारी मध्यरात्री एकतर्फी प्रेम प्रकरणातून एका अल्पवयीन मुलीची हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी विविध आदिवासी संघटनांनी एकत्र येत मुलीला न्याय देण्याची मागणी केली आहे. यावेळी आदिवासी समुदायाकडून रॅली काढत तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे. आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान घटनेनंतर आरोपीचे नातेवाईक गाव सोडून गेले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.