नंदुरबार -जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहादा तळोदा आणि अक्कलकुवा तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खासदार डॉ. हिना गावित यांनी नुकसान झालेल्या गावांची पाहणी करून त्वरित भरपाई देण्याची मागणी केली आहे. यावेळी नंदुरबार मतदारसंघाचे आमदार डॉ. विजयकुमार गावित, शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी उपस्थित होते. या वादळी वाऱ्यामुळे तळोदा तालुक्यातील शेतकऱ्याचे पोल्ट्री फार्म पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, जवळपास 20 लाख रुपयांचे नुकसान झाले. नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.
जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे अक्कलकुवा, तळोदा आणि शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या तिन्ही तालुक्यातील शकडो घरांचे नुकसान झाले आहे. त्याच सोबत मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान आहे. यात केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तयार झालेले केळीचे झाडे पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अनेक घरांची पडझड झाली आहे तर जवळपास दहा ते बारा जण जखमी झाले आहेत.
वादळी वाऱ्यासह पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार - खासदार हिना गावित - नंदुरबार पावसामुळे नुकसान
नागरिकांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही, असे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर केंद्र शासनाकडे व राज्य शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करून नुकसानग्रस्तांना मदत मिळवून दिले जाईल, असे खासदार गावित यांनी सांगितले.
अनेक जण बेघर झाले आहेत. पडलेल्या घरांचे व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून यादी त्वरित ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात यावी त्याचबरोबर पंचनाम्यात कुठली त्रुटी असल्यास त्वरित सुधारणा करणे. योग्य तो अहवाल शासनाकडे सादर करावे जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व नागरिकांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही, असे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर केंद्र शासनाकडे व राज्य शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करून नुकसानग्रस्तांना मदत मिळवून दिले जाईल, असे खासदार गावित यांनी सांगितले.