नंदुरबार - शहादा तालुक्यातील रायखेड येथील पपई उत्पादक शेतकऱ्यांनी पपईवर मोझाईक रोग आल्यामुळे सहा एकर काढणीवर आलेली पपई तोडून फेकली. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
पपईवर मोझाईक रोग पडल्यामुळे सहा एकरवरील पपई झाडे तोडून फेकली
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्या रायखेड येथील पपई उत्पादक शेतकऱ्यांनी पपईवर मोझाईक रोग पडल्यामुळे सहा एकर काढणीवर आलेली पपईची झाडे तोडून टाकली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना लाखोंचे नुकसान सहन करावे लागले आहे.
पपई पिकावर मोझाईक रोग पडल्यामुळे झाडे कापून फेकली -
शहादा तालुक्यातील रायखेड शिवारातील शेतकरी वासुदेव महादेव पाटील यांनी पपई पिकावर मोझाईक रोग आल्यामुळे आपल्यात शेतातील तोडणीवर आलेल्या सहा एकर क्षेत्रातील पपई कापून फेकून दिली आहे. दरवर्षी पपई पिकावर नवनवीन रोग येत असतात. या रोगांवर महागडी औषधे फवारणी करून देखील फायदा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागत असते.
वासुदेव पाटील यांनी एप्रिल महिन्यात साडे पाच हजार रोपांची लागवड केली होती. रोपांना जगण्यासाठी रासायनिक खतांबरोबर इतर खर्च केला होता. परंतु तीन महिन्यानंतरही पपई पिकांवर मोझाईक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने खर्चही निघताना दिसत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी चक्क पपईचे झाडे कापून विकायला सुरुवात केली आहे. सुमारे अडीच लाखांच्यावर नुकसान झाल्याचे वासुदेव पाटील यांनी सांगितले.
पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिकांवर रोगराई -
नंदुरबार जिल्ह्यात संपूर्ण जून महिना कोरडा ठाक गेल्याने त्रस्त असलेल्या बळीराजाला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. पाऊस पडला असता तर पिकांवरील रोगराई धुवून निघाली असती व पिकांवर पावसाचा चांगला परिणाम झाला असता, असे मत वासुदेव पाटील यांनी व्यक्त केले आहे.