नंदुरबार - देशातील सर्वात मोठ्या घोडे बाजारांपैकी एक सारंगखेडा येथील यात्रेच्या निमित्ताने भरल्या जाणाऱ्या घोडेबाजाराची ओळख आहे. यावर्षी या बाजारात 3 हजारपेक्षा जास्त घोडे दाखल होण्याची शक्यता, आयोजकांनी वर्तवली आहे. तर आतापर्यंत या ठिकाणी 700 घोडे दाखल झाले आहेत.
जिल्ह्यातील सारंगखेडा येथे एकमुखी दत्ताची यात्रा भरते आणि त्यानिमित्ताने भरणाऱ्या घोडे बाजाराची ओळख देशातील सर्वात मोठा घोडे बाजारपैकी एक अशी आहे. घोडे बाजाराला दत्त जयंती पासून सुरुवात होते. बाजारात सारंगखेडा येथे देशातून अश्व शौकीन घोडे खरेदी आणि विक्रीसाठी येत असतात. यात्रा अवघ्या काही दिवसांवर यात्रा आली आहे तरी आतापर्यंत ७०० हून अधिक घोडे यात्रेत दाखल झाले आहेत. तर दत्त जयंतीपर्यंत याठिकाणी 3 हजारपेक्षा जास्त घोड्यांची आवक होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.