नंदुरबार - दुकानाच्या काऊंटरवरुन चोरट्याने दुकानदाराचा मोबाईल लांबविल्याची घटना नंदुरबारात घडली. मोबाईल चोरटा दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. याप्रकरणी अज्ञाताविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबारमध्ये दुकानाच्या काऊंटरवरुन मोबाईल लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
नंदुरबारमध्ये एका चोरट्याने दुकानदाराचा मोबाईल लांबवला आहे. मोबाईल चोरणारा व्यक्ती सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरटा सीसीटीव्हीत कैद -
नंदुरबार शहरातील शंकर नगरात राहणारे विशाल कुशसिंह ठाकुर यांचे एकलव्य हायस्कूलसमोर प्रथा इलेक्ट्रीक दुकान आहे. या दुकानावर सकाळी 11.50 वाजेदरम्यान एक ग्राहक लाईट घेण्यासाठी आला. त्यावेळी दुकानदाराने आपला मोबाईल काऊंटरवर ठेवुन ग्राहकास लाईट बल्ब दाखविला. याचवेळी दुकानावर आलेल्या एका अज्ञाताने हातचलाखीतुन काऊंटरवरुन मोबाईल चोरुन नेला आहे. ग्राहक गेल्यानंतर दुकानदार मोबाईल घेण्यास गेला असता त्याठिकाणी मोबाईल मिळुन आला नाही. त्यामुळे त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ग्राहकाला लाईट बल्ब दाखवित असतांना त्याचवेळी आलेल्या एक अज्ञात इसम मोबाईल चोरुन घेऊन जात असल्याचे चित्रीकरण दिसून आले. याबाबत विशाल कुशसिंह ठाकुर यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुरट्या चोरांचा वावर वाढला -
शहरात भुरट्या चोरांचा वावर वाढला आहे. हे चोरटे मोटार सायकल, इलेक्ट्रिक मोटार, शेतातील साहित्यांची चोरी करत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा -४ कोटी रुपयांची रोकड लुटणाऱ्या आरोपींना बेड्या, कोटक महिंद्रा एटीएम व्हॅन प्रकरण
हेही वाचा -ठाण्यात सराफा दुकानावर भरदिवसा सशस्त्र दरोडा, ९ लाख ७६ हजाराचा ऐवज घेऊन चोरटे पसार