नंदूरबार -शहादा डोंगरगाव रस्त्याची दुरवस्था झाली असून गेल्या तीन वर्षापासून या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठपुरावा करीत होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका प्रशासन या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी घेण्यास तयार नव्हते. यामुळे रस्त्यामधील खड्ड्यांमध्ये बसून प्रशासनाचा निषेध करण्यासाठी मनसैनिकांनी मुंडन आंदोलन केले.
नंदूरबारमध्ये मनसेचे अनोखे आंदोलन.. रस्त्यावरील खड्ड्यात केले मुंडन
नंदूरबार मध्ये मनसेने रसत्यावरील खड्ड्यांमध्ये बसून प्रशासनाचा निषेध करण्यासाठी मुंडन आंदोलन केले. या रस्त्यावर दोन फुटापासून ते चार फुटापर्यंत खड्डे पडले आहेत.
मनसेचे अनोखे आंदोलन
या रस्त्याची खूप दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी दोन फुटापासून चार फुटापर्यंत खड्डे पडले आहेत. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होतात. यामुळे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे नेते मनलेश जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली या रस्त्यामधील खड्ड्यांमध्ये बसून प्रशासनाचा निषेध करण्यासाठी मनसैनिकांनी मुंडन आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात वाहन धारक ही सहभागी झाले होते.