नंदुरबार- केंद्रातील भाजप सरकार हे हिंदू विरोधी असून गंगा नदीत वाहून गेलेले मृतदेह हे हिंदूचे नव्हते का, असा प्रश्न राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. 'चाय मे बिस्कीट नही, पुरा देश डूब रहा है, असा उपरोधात्मक टोलाही त्यांनी लगावला.
राम तेरी गंगा मैली हो गई
भाजप सरकार केवळ टीका करत असते. त्यांच्यावर काहीही टीका केली तर केवळ जय श्री राम म्हणतात. पण, केंद्राचे भाजप सरकार हे हिंदू विरोधी सरकार असून राम ते गंगा मैली हो गई म्हणण्याची वेळ आली आहे. गंगा नदीत वाहून गेलेले मृतदेह हे हिंदूचे नव्हते का, असा प्रश्न उपस्थित केला. महाआघाडी सरकार आकडे लपवत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.