नंदुरबार - आदिवासी विभागाला निधीची कमतरता आहे. याबाबद खुद्द राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी ( Minister K C Padvis displeasure over less fund ) यांनीच नाराजी व्यक्त केली आहे. आणखीन एका कॉंग्रेस मंत्र्यांच्या निधी कमतरतेबाबतच्या नाराजीचे पक्षश्रेष्ठींकडे गाऱ्हाणे मांडले आहे. हायकमांडला सर्व बाबीबाबत सूचित केले असल्याचे मंत्री के. सी. पाडवी यांनी सांगितले आहे.
आदिवासी विकास विभागाला कमी निधी
राज्यातील इतर विभागांना आस्थापना खर्च सामान्य अर्थसंकल्पमेमधून मिळतो. मात्र आदिवासी विकास विभागाला हा खर्च विकासाच्या निधींमधून करावा लागत ( expenditure on establishment for tribal development ) आहे. त्यामुळे विकासाच्या योजनांसाठी निधी कमी पडत ( Fund for tribal development ) आहे. याबाबत राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांकडे याबाबतमागणीदेखील करण्यात आल्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांनी म्हटले आहे.