नंदुरबार - जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांची तालुक्यातील रनाळा येथे सभा झाली. या सभेत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाला जोरदार उत्तर देत त्यांनी उपस्थित मतदारांचे मत वळविण्याचे प्रयत्न केले. यावेळी मोठ्या संख्येने मतदार त्यांना ऐकण्यासाठी उपस्थित होते.
'खा भाजपच मटण, पण दाबा शिवसेनेचं बटन' - गुलाबराव पाटील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचार अंतिम टप्प्यावर आला असताना गुलाबराव पाटील यांची नंदुरबार तालुक्यातील रनाळा मतदारसंघात सभा झाली. शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते आले होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांचे जोरदार खंडन केले. यावेळी पाटील म्हणाले, की 'खा भाजपाच मटण, पण दाबा शिवसेनेच बटन' असा खोचक टोला लगावत पाटील यांनी फडणवीसांसह भाजपाला टीकेचे लक्ष केले आहे.
हेही वाचा -'देवेंद्र फडणवीस अजून मुख्यमंत्री पदाच्या कोषातून बाहेर पडले नाहीत'
जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री राहिलेला माणूस प्रचार करतो, याचाच अर्थ भाजपच्या पाया खालची वाळू सरकली आहे. हे म्हणजे बीए पास माणूस पाचवीत आल्यासारखे झाल्याचे म्हणत त्यांनी फडणवीसांना टोला लगावला. आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांनी तब्बल ४9 ठिकाणी बंडखोर उमेदवार सेनेच्या आमदारांना पाडण्यासाठी उभे केले. मात्र, तरीही आम्ही निवडून आलो. भाजप हा शिवसेनेच्या खांद्यावर वाढलेला वेल असल्याने त्यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये, असा टोला देखील लगावला. भाजपाने मुस्लिमांचा वापर फक्त राजकारणासाठी केला असून त्यांना गुड्डी के बाल आणि भंगारवाला बनवला. त्यामुळे मुस्लिमांनी हे ओळखण्याची वेळ असल्याचे पाटील यांनी सांगीतले.
हेही वाचा -विश्वासघाताने येतात ते विश्वासघातच करतात - देवेंद्र फडणवीस
जिसके हात मे दंडा उसी की भैस, असे सांगत सत्ता आपल्याकडे असल्याचा इशारा गुलाबराव पाटलांनी दिला आहे. यावेळी खास खान्देशी अहिराणी भाषेतून कर्जमाफीवर त्यांनी भाजपाला टीकेचे लक्ष केल्याने एकच हशा पिकला. शनिवारी त्यांच्या उपस्थितीमध्ये नंदुरबारमधल्या रनाळा येथे शिवेसनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा संपन्न झाली.
यावेळी मंचावर शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे, शिवसेना नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, दीपक गवते, रनाळे गटातील व गणातील उमेदवार, रनाळे सरपंच व शिवसैनिक उपस्थित होते.