नंदुरबार - जिल्ह्यातील शहादा तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज दुपारी 1 वाजून 24 मिनिटांनी सावळदा येथील भूकंप मापन केंद्रावर भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. याची तीव्रता 3.2 रेक्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली आहे.
भूगर्भातून मोठ्या प्रमाणात आवाज
भूकंपाचे केंद्र महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. शहादा शहर आणि तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले तर काही ठिकाणी भूगर्भातून मोठ्या प्रमाणात आवाज झाल्याचे ही सांगितले जात आहे.
घरांना गेले तडे
शहादा तालुक्यातील जयनगर कहाटुळ परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. त्यामुळे काही घरांना तळे गेले आहेत. तर काही ठिकाणी घरातील वस्तूंची पडझड झाली आहे. मात्र कुठल्याही प्रकारचे मोठे नुकसान झालेली नाही.
भूकंपमापक केंद्र अधिकाऱ्यांची माहिती
शहादा तालुक्यात काही गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले असून तो भूकंप 3.2 रिश्टर स्केलचा आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील गावांना या भूकंपाचा धक्का बसला आहे. भूकंपाची तीव्रता मध्यप्रदेशात जास्त प्रमाणावर असू शकेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.