नंदुरबार- लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या परराज्यातील अडकलेल्या मजुरांना एसटीने महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत सोडण्यात येत आहे. तसेच इतर राज्यांतून सीमेवर आलेल्या महाराष्ट्रातील मजुरांना ही एसटी त्यांच्या जिल्ह्यांपर्यंत सोडणार आहे. हा प्रवास मजुरांना मोफत आहे. गुजारातमधून मध्य प्रदेशकडे पायपीट करत निघालेले मजूर महाराष्ट्रातील नवापूरमध्ये दाखल झाले होते. या मजुरांना एसटीने मध्यप्रदेशच्या सीमेपर्यंत सोडण्यात आले आहे.
पायपीट करणाऱ्या मजुरांना 'लालपरी'ने मध्यप्रदेशच्या सीमेपर्यंत पोहोचवले - Nandurbar Migrant worker news
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे या मजुरांचे काम बंद झाले आहे. त्यामुळे या मजुरांनी गावाचा रस्ता धरला आहे. हजारो मजूर पायपीट करत तसेच मिळेल त्या वाहनाने गावाकडे परतत आहेत. या पायपीट करणाऱ्या मजुरांच्या मदतीला आता महाराष्ट्रातील लालपरी आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे या मजुरांचे काम बंद झाले आहे. त्यामुळे या मजुरांनी गावाचा रस्ता धरला आहे. हजारो मजूर पायपीट करत तसेच मिळेल त्या वाहनाने गावाकडे परतत आहेत. या पायपीट करणाऱ्या मजुरांच्या मदतीला आता महाराष्ट्रातील लालपरी आली आहे. महाराष्ट्र एसटीद्वारे गुजरातच्या सीमावर्ती भागात पायपीट करत दाखल झालेल्या हजारो मजूरांना मध्यप्रदेश सीमेपर्यंत पोहोचवले जात आहे. यासाठी एसटी महामंडळाकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येत नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
मजुरांची आरोग्य तपासणी करून मगच त्यांना बसमधून सोडण्यात येत आहे. तसेच स्थलांतरित मजुरांना जेवणही प्रशासनाच्यावतीने देण्यात येत आहे. मजुरांना सोडून परत आल्यानंतर त्या बसमध्ये फवारणी करून बसचे निर्जंतुकीकरण करण्यात येते.