नंदुरबार - जिल्ह्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत नंदुरबारच्या खासदार हिना गावित सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी बहिणीसोबत नृत्य देखील केले.
नंदुरबारमध्ये विसर्जन मिरवणूक उत्साहात; ढोल-ताशांच्या गजरात खासदार हिना गावितांनीही केले नृत्य - हिना गावित नृत्यू
नंदुरबार शहरातील प्रथम मानाचा गणपती मिरवणुकीत खासदार हिना गावित आणि आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सहाभागी हाऊन आनंद लुटला आहे.
हिना गावितांनी घेतला गणेश मिरवणुकीचा आनंद
नंदुरबार शहरातील प्रथम मानाचा गणपती मिरवणूक मुख्य मार्गावर आल्यानंतर नंदुरबारच्या खासदार हिना गावित व आमदार डॉ. विजयकुमार गावित हे या मिरवणुकीत सहभागी झाले. यावेळी खासदार हिना गावित यांनी मंडळातील भगिनींसोबत मिरवणुकीत नृत्य करून गणेश विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेतला.
हेही वाचा -सांगली : मिरजेतील ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकांना सुरुवात