नंदुरबार -नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात वसलेला आहे. गुजरात राज्यातून महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर प्रवासी येत असतात. महाराष्ट्रात कोरोनारुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महाराष्ट्राच्या सीमेवर येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी नवापूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत केली जात असते. कुठल्याही प्रवासात कोरोनासदृष्ट लक्षणे आढळून आल्यास त्यांना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
गुजरात राज्यातून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी
गुजरात राज्यातून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची महाराष्ट्रातील वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात येते. त्याचबरोबर वाहनातील प्रत्येक व्यक्तीची थर्मल स्कॅनिंग ऑक्सीमीटर तपासणी करण्यात येते. कोरोनासदृश्य लक्षणे आढळून आल्यास त्यांची rt-pcr टेस्ट करण्यात येते, अशी माहिती नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.