महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदूरबारमध्ये विवाहित प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या - नवापूर

सोमुवेल गावित आणि सपना गावित असे आत्महत्या केलेल्या युगुलाचे नाव आहे. या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नंदूरबारमध्ये विवाहित प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

By

Published : May 16, 2019, 6:10 PM IST

नंदूरबार- नवापूर तालुक्याच्या डाबरीफळी तिळासर येथील एका विवाहित प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सोमुवेल गावित आणि सपना गावित असे आत्महत्या केलेल्या युगुलाचे नाव आहे. या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


कसे जुळले प्रेमसंबंध -
नवापूर तालुक्यात डाबरीफळी तिळासर येथील सोमुवेल सुदाम गावित (वय 34) आणि सपना निलेश गावित (वय 32) हे दोघेही अंठीपाडा येथे एका गूळ उत्पादन कारखान्यात काम करत होते. याच ठिकाणी दोघांचे प्रेम संबंध जुळले. ही बातमी सपनाच्या पतीला कळल्यावर या दोन्ही प्रेमी युगलांनी 14 मे रोजी नाशिक येथे पळ काढला.


दोन दिवसानंतर सोमुवेल गावित याने त्याचे वडील सुदाम गावित यांना फोनवरून विवाहित सपना गावित हिच्याशी प्रेमसंबंधाची माहिती दिली. महत्वाचे म्हणजे दोघांचेही लग्न झालेले आहे. सपनाला एक 3 वर्षाची मुलगी देखील आहे. तरी त्यांचे प्रेमसंबंध जुळल्याने ते नाशिक येथे पळून गेले होते.


त्यानंतर सोमुवेल गावित याने मी सपना सोबत नाशिकहून येत आहे, मला पिंपळनेर येथे घेण्यास या, असे वडील सुदाम यांना सांगितले. आल्यावर त्याने वडील सुदाम यांना सर्व हकिकत सांगितली. तेव्हा वडिलांनी गावातील पोलीस-पाटील यांना याची माहिती दिली. सकाळी यावर आपण निर्णय घेऊ, असे सांगत पोलीस-पाटलांनी सगळ्यांना झोपण्यास सांगितले.


आत्महत्या केल्याचे कसे कळाले -
पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास सपनाची 3 वर्षाची मुलगी रडत असल्याचे जाणवल्यावर घरातील मंडळींनी सोमुवेल यांच्या खोलीत जाऊन पाहिले. तेव्हा सोमुवेल आणि सपना त्या खोलीत नव्हते. शोधशोध केल्यानंतर शेतातील आंब्याच्या झाडाला दोघांचे मृतदेह लटकल्याचे निदर्शनात आले. त्या दोघांनी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला होता. आपल्या प्रेमसंबंधाला समाज मान्यता देईल की नाही या विचाराने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या घटनेची सुदाम गावित यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details