नंदुरबार- जिल्ह्यातील प्रमुख सणांपैकी होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आदिवासी समाजात होळीच्या सणाला विशेष असे महत्त्व आहे. सातपुड्यात पंधरा दिवस हा उत्सव साजरा केला जातो. पारंपरिक वेशभूषा, पारंपरिक ढोल ताशांचा गजर या होळीत विशेष असतो.
होळीसाठी लागणाऱ्या हार अन् कंगणांनी बाजारपेठ सजली... हेही वाचा-कोरोनाच्या भीतीने परदेशातून आलेल्या दोन जणांवर पाळत
हलवाई परिवार होळीसाठी साखरेपासून हार आणि कांगण बनवतात. याचा होळीच्या पूजेसाठी वापर होतो. या वर्षी साखरेचे दर वाढल्याने हार व कंगणचे दर वाढले आहेत. हार व कंगणाचा उपयोग गुढीपाडव्याच्या पूजेत देखील केला जातो, अशी माहिती हारुण हलवाई यांनी दिली.
होळीचा काळात नंदुरबारच्या हलवाई वाड्यात कारखाने लावण्यात येतात. होळीच्या दोन आठवड्यांपूर्वीच त्याची लगबग सुरू असते. येथे होळीसाठी लागणार्या वस्तू हजारो कारागीर बनवितात. साखरेचा पाक बनवून तो लाकडी साच्यात टाकला जातो. त्यानंतर वस्तू तयार केल्या जातात. दरवर्षी 1 हजार 100 ते 1 हजरा 200 क्विंटलच्या साखरेच्या वस्तू याठिकाणी बनविल्या जातात.