नंदुरबार- कोरोनाचा प्रसार होऊ नये, यामुळे सर्वत्र संचारबंदी घालण्यात आली आहे. सर्वांना गर्दी न करण्याच्या सूचना देण्यात येत आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी संचारबंदी शिथील करण्यात आली आहे. पण, ते खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि व्यापाऱ्यांनी ठराविक अंतरावर आखणी करत सोशल डिस्टंस राखण्याचा प्रयत्न केला आहे.
#COVID19 : दुकानदार व पोलिसांकडून राखले जातेय नागरिकांचे 'सोशल डिस्टंस' - कोरोना
नंदुरबारमध्ये प्रशासन व दुकानदारांकडून ग्राहकांध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी आखणी केली जात आहे. तसेच काही दुकानदारांकडून दुकानात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या हातावर सॅनिटाय
कोरोनाचा प्रसार होऊ यासाठी सुरक्षित अंतर ठेवण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. पण, किराणा, भाजीपाला खरेदीवेळी गर्दी होत असल्याने व्यापाऱ्यांनी ठराविक अंतरावर आखणी केली असून ग्राहकांना त्याच आखणीमध्ये उभे राहण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळे सुरक्षित अंतर राहत असून एका-एका ग्रहाकाला दुकानात सोडले जात आहे. तसेच दुकानाच्या बाहेर हतधुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्यावतीने या प्रकारे व्यवस्था करण्यात येत असल्यामुळे नागरिकांची गर्दी कमी होऊन योग्य ती काळजी घेतली जात आहे. यामुळे नागरिकही प्रशासनाला सहकार्य करत आहेत.
हेही वाचा -नंदुरबारमध्ये संचारबंदीचे उल्लंघन.. ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल