महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम - नंदुरबार कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम

महाराष्ट्रात पुणे, नागपूर, जालना आणि नंदुरबार या चार जिल्हात कोरोना लस ड्राय रनची तालिम होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात तीन ठिकाणी ड्राय रन सुरू करण्यात येत आहे.

ड्राय रन
ड्राय रन

By

Published : Jan 2, 2021, 9:46 AM IST

नंदुरबार - नव्या वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीचा ड्राय रन म्हणजेच रंगीत तालिम होणार आहे. महाराष्ट्रात पुणे, नागपूर, जालना आणि नंदुरबार या चार जिल्हात या ड्राय रनची तालिम होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात तीन ठिकाणी ड्राय रन सुरू करण्यात येत आहे.

जिल्हात कोरोना लस ड्राय रन

नंदुरबार जिल्हा रुग्णालय, आष्टे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नवापूर उप रुग्णालयात लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात येत आहे. यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रात पाच कर्मचारी लस देण्याची प्रक्रिया पार पडणार आहेत. तसेच प्रत्येक केंद्रावर आज 25 जणांना लस देण्याचे प्रात्याक्षीक करण्यात येणार आहे. तर एकूण 75 जणांना लस देण्याचे प्रात्यक्षिक पार पडणार आहे. लस घेण्याच्या प्रक्रियेत सामील हे सर्व 75 जण हे आरोग्य विभागाचे कर्मचारी आहेत. या सर्व प्रक्रियेवर लक्ष देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राहणार आहे

असा असेल ड्राय रन ?

  • सकाळी 9 वाजता सुरु होणार लसीकरणाची प्रक्रिया
  • प्रत्येक केंद्रावर 25 जणांना लस देण्यासाठी एक दिवस आधी एस.एम.एस पाठवले गेले आहेत.
  • एस.एम.एस आलेले व्यक्ती लस देण्याच्या केंद्रावर येतील.
  • एम.एम.एस पाठवलेले लोक आले आहेत का हे तपासले जाणार.
  • पुढे त्यांना एका वैटिंग रूममध्ये बसवण्यात येईल.
  • या व्यक्तींची माहिती मोबाईल अँपमध्ये अपलोड करणार येणार.
  • एक आरोग्य सेविका प्रत्यक्ष लस देणार.
  • पुन्हा संबधित व्यक्तीला लस दिली गेल्याची माहिती मोबाईल अँपवर अपलोड करणार.
  • लस घेतलेल्या व्यक्तीला एका निरीक्षण कक्षात थांबवण्यात येणार.
  • अर्धा तास निगराणी खाली राहिल्यावर लस घेतलेल्या व्यक्तीला घरी जाऊ दिले जाईल.
  • लस घेतल्यांवर काही त्रास झाला. तर अश्या व्यक्तींना वेगळे केले जाईल.

दरम्यान, भारतामध्ये २०२० या वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर मार्च महिन्यापासून महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाउन करण्यात आला. जगभरात कोरोनावर लस शोधण्याचे कामही सुरु झाले. आता जगातील अनेक देशात कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली आहे. भारतात आज नव्या वर्षाच्या सुरूवातीला लसीकरणाचा ड्राय रन राबवला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details