महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्र दिन विशेष : राज्यातील असे रेल्वेस्थानक, जिथे महाराष्ट्रात तिकीट काढून गुजरातेत पकडावी लागते रेल्वे.. - #MaharashtraDay

या रेल्वे स्थानकाची विशेषता म्हणजे दोन राज्यांच्या सीमा अगदी स्थानकाच्या मध्यभागातून गेल्या आहेत. या रेल्वेस्थानकाचा अर्धा भाग महाराष्ट्र राज्यात येतो तर अर्धा भाग गुजरात राज्यात येतो.

नंदुरबार

By

Published : May 1, 2019, 7:48 AM IST

Updated : May 1, 2019, 10:42 AM IST

नंदुरबार- महाराष्ट्र आणि गुजरात या सीमावर्ती भागात असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर रेल्वेस्थानक एक अनोखे रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकाची विशेषता म्हणजे दोन राज्यांच्या सीमा अगदी स्थानकाच्या मध्यभागातून गेल्या आहेत. या रेल्वेस्थानकाचा अर्धा भाग महाराष्ट्र राज्यात येतो तर अर्धा भाग गुजरात राज्यात येतो.

नवापूर रेल्वेस्थानक एक अनोखे रेल्वे स्थानक

ब्रिटिश काळापासून दळणवळण व व्यापारासाठी रेल्वेमार्गाची निर्मिती झाली तेव्हापासून नवापूर रेल्वे स्थानक अस्तित्वात आले. कालांतराने संयुक्त महाराष्ट्रातून १ मे १९६० साली वेगळ्या महाराष्ट्र व गुजरात राज्याची स्थापना झाली. त्यावेळी नवापूर रेल्वे स्थानकाच्या मधून दोन राज्यांच्या सीमा गेल्याने प्रवाशांना महाराष्ट्रात उभे राहून तिकीट घ्यावे लागते आणि प्रवासासाठी गाडी पकडायला गुजरातमध्ये असलेल्या प्लॅटफॉर्मवर जावे लागते. विशेष म्हणजे येथे चार भाषांमध्ये सूचना (अनांउन्समेंन्ट) दिल्या जातात. या रेल्वेस्थानकाला आदर्श रेल्वेस्थानक म्हणून पुरस्कारही मिळाला आहे.

ज्याप्रकारे नवापूर रेल्वे स्थानकामध्ये गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमा जोडल्या गेल्या आहेत. त्याच प्रकारे गुजराती आणि मराठी बांधवांची मने देखील जोडली गेली आहेत. या दोन्ही भाषिकांमध्ये असलेला भाईचारा त्यांचे सण-उत्सव व्यापार-व्यवसाय या व्यवहारामुळे सिद्ध झाले आहेत. याचेच प्रतिक म्हणून नवापूर रेल्वे स्थानकाकडे बघितले जाते.

Last Updated : May 1, 2019, 10:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details