महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबार : विजयादशमी निमीत्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिस्तबद्ध पथसंचलन - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चार प्रमुख उत्सवांपैकी एक म्हणजे विजयादशमी उत्सव. यानिमीत्त शहरात स्वयंसेवकांचे पथसंचलन आयोजित करण्यात आले होते. या संचलनात शहरातील अनेक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता.

पथसंचलन

By

Published : Oct 8, 2019, 7:20 PM IST

नंदुरबार - विजयादशमी निमीत्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन शहरात अयोजित करण्यात आले होते. यावेळी शकडो स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात घोष पथकाच्या तालावर पथ संचलनात सहभाग घेतला होता.

पथसंचलनाची दृष्ये

हेही वाचा -भारतीय वायुसेना दिवस :लढाऊ विमानांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांसह पार पडला विशेष कार्यक्रम...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चार प्रमुख उत्सवांपैकी एक म्हणजे विजयादशमी उत्सव. यानिमीत्त शहरात स्वयंसेवकांचे पथसंचलन आयोजित करण्यात आले होते. माळीवाडा परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून या पथसंचलनाला सुरुवात झाली. दरम्यान, या पथसंचलनात शहरातील अनेक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. शहरातील मुख्य रस्त्यावरून हे पथसंचलन छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरापर्यंत करण्यात आले, यानंतर नाट्य मंदिर परिसरात या संचलनाचा समारोप करण्यात आला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आलेले हे पथसंचलन नंदुरबारकरांना आकर्षित करीत होते.

हेही वाचा -आयुष्मान खुराना, रणवीर सिंगवर अक्षयच्या 'बाला'ची क्रेझ, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details