नंदुरबार - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. संचारबंदीत सर्व दुकाने बंद असल्याने तळीरामांची मोठी अडचण झाली आहे. मात्र, कोणत्या ना कोणत्या मार्गाने दारू विक्री होत असल्याचा प्रकार अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. शहादा तालुक्यातील म्हसावद-अनकवाडे शिवारात तब्बल सव्वा दोन लाखाचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
अनकवाडे शिवारातून सव्वा दोन लाखाचा मद्यसाठा जप्त; नंदुरबार राज्य उत्पादन शुल्कची कारवाई - State excise duty Department
शहादा तालुक्यातील म्हसावद ते अनकवाडे रस्त्यालगत प्रिया बिअर शॉपीच्यामागे अवैधरित्या मद्यसाठा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. या पथकाने बिअर शॉपीवर धाड टाकली असता त्या ठिकाणी अवैद्य मद्यसाठा आढळून आला.
शहादा तालुक्यातील म्हसावद ते अनकवाडे रस्त्यालगत प्रिया बिअर शॉपीच्यामागे अवैधरित्या मद्यसाठा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. या पथकाने बिअर शॉपीवर धाड टाकली असता त्या ठिकाणी अवैद्य मद्यसाठा आढळून आला. त्यात मध्यप्रदेशमध्ये तयार झालेला मद्यसाठा आणि दुचाकी असा, एकूण दोन लाख 24 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी योगेश भगवान पवार (रा.अनकवाडे ता.शहादा) याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे विभागीय उपायुक्त अर्जून ओहोळ, नंदुरबारचे अधिक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात खेड-दिरगर सिमा तपासणी नाका पथकाचे दुय्यम निरीक्षक ए.पी.शिंदे, सहायक दुय्यम निरीक्षक एम.के.पवार, सहायक दुय्यम निरीक्षक आर.एल.राजपूत, जवान राहुल साळवे, तुषार सोनवणे, कपिल ठाकूर यांनी सहभाग घेतला.