नंदुरबार - ऑरेंज झोनमध्येमध्ये मद्य विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र या निर्णयाची अजून पर्यंत नंदुरबार जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली नसल्याने मद्यपी नाराज झाले आहेत. मद्य मिळेल या आशेने नागरिकांनी वाईन शॉप समोर सकाळपासूनच रांगा लावून ठेवल्या आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात मद्यविक्री बंद; मात्र दुकानांच्या बाहेर मद्यपींच्या लांबपर्यंत रांगा - Liquor sales
ऑरेंज झोनमध्येमध्ये मद्य विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र या निर्णयाची अजून पर्यंत नंदुरबार जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली नसल्याने मद्यपी नाराज झाले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये असल्यामुळे नागरिकांना शहरात मद्य विक्री सुरू होईल, असा समज झाला असल्यामुळे सकाळपासूनच नागरिकांनी वाईन शॉप समोर मोठी रांग लावून ठेवली. मात्र, दुकाने न उघडल्याने नागरिकांना नैराश्य घेऊन परतावे लागले.
आज सकाळपासूनच नंदुरबार शहरातील विविध वाईन शॉप चा बाहेर नागरिकांनी दारू खरेदी करण्यासाठी मोठमोठ्या रांगा लावल्या होत्या. योग्य ते शारीरिक आंतर ठेवत नागरिकांनी सकाळपासूनच मद्यच्या दुकानाच्या बाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाचे कोणतेही आदेश नसल्याने दुकानदारांनी अजूनही नंदुरबार शहरात मद्य विक्री करण्यास सुरुवात केली नाही.