नंदुरबार - तळोदा शहरातील अमरधाम जवळील गॅरेजमध्ये बिबट्याचे बछडे आढळून आले आहे. ही बछडे रात्रीच्या सुमारास गॅरेजमध्ये जात असल्याचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाल्याने खळबळ उडाली आहे. वनविभागाने बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.
तळोदा शहरातील शहादा रस्त्यावरील अमरधाम जवळ जे. के. गॅरेज आहे. या गॅरेजमध्ये रात्री बिबट्याचे बछडे जात असल्याचे चित्रीकरण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहे. बिबट्याचे बछडे दुकानात आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गॅरेजमध्ये बिबट्याचे बछडे आढळल्याचे गॅरेजचे मालक जलील अन्सारी यांनी सांगितले. वनविभागाने बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.